esakal | सरकारने वेळीच निर्णय न घेल्यास आंदोलन तीव्र करु : पिचड
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Former MLA Madhukarrao Peechad agitation in Akola taluka for milk price

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून ठाकरे सरकारने नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे.

सरकारने वेळीच निर्णय न घेल्यास आंदोलन तीव्र करु : पिचड

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून ठाकरे सरकारने नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने दुधाला १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे, यासाठी महाएल्गार आंदोलनात सर्व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला आहे.

अहमदनग जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आज सकाळी साडेसात वाजता अन्यायाविरूद्ध एल्गार करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असून याच दिवशी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अहिंसक पद्धतीने महाएल्गार आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात आले. प्रथम या महान नेत्यांना वंदन करून तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना मित्रपक्ष व कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यात आले. यावेळी प्रत्येकाच्या दंडावर काळ्या फित बांधण्यात आला होत्या. दुधाला 30 रुपये भाव मिळलाच पाहिजे, महाआघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे, आशा घोषणा देण्यात आल्या.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्य सरकारने काहीच मदत केली नाही. राज्यातील दुध उत्पादक शेतकरीही अडचणीत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर पाच रुपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले. आता तर दुधाचे दर त्यावेळेपेक्षाही खालावले आहेत. मात्र राज्यातील नाकर्त्या सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडून दिले आहे. मागण्या मान्य करण्याकरिता भाजपा महायुतीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. 

गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्या, दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान द्या, दुध खरेदीचा दर प्रती लिटर ३५ रुपये करा. या मागण्यांचे व राज्य सरकारच्या धिक्काराचे फलक घेऊन व काळी रिबन बांधून सकाळी दुध संकलन केंद्रावर आंदोलन झाले. यावेळी मधुकर नवले, गिरजा जाधव, यशवंत अभाले, भाजपचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image