
पाथर्डी : ईडी व सीबीआयची भीती दाखवत भाजपने राज्यातील विरोधक शिल्लक ठेवला नाही, तरीही भाजपच्या या नीती विरोधात वंचित बहुजन आघाडी सक्षम विरोधकाची भूमिका बजावत आहे, असे मत वंचितचे राज्याचे उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी व्यक्त केले. शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत ते बोलत होते.