esakal | श्रीगोंद्यात गरम दूधाचे वाटप करून भाजपाचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MLA Babanrao Pachpute agitation by distributing milk in Shrigonda taluka

लॉकडाउन काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. दूध व्यवसायाबाबत सरकार शेतकर्‍यांची हेळसांड करीत आहे.

श्रीगोंद्यात गरम दूधाचे वाटप करून भाजपाचे आंदोलन

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : लॉकडाउन काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. दूध व्यवसायाबाबत सरकार शेतकर्‍यांची हेळसांड करीत आहे.  आम्ही ही कष्टाने दूध धंदा करतो. त्यामुळे दूध ओतून देण्याऐवजी गरम दुधाचे वाटप करून सरकारचे दूध व्यवसायाकडे लक्ष वेधीत आहोत, असे सांगत आमदार बबनराव पाचपुते यांनी दूध दरवाढीबाबत आंदोलन केले.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहरातील शनि चौक येथे आमदार पाचपुते यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते, दादा ढवाण, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे या प्रमुखांनी आंदोलनात भाग घेतला. कोरोना लॉकडाऊन व श्रीगोंदे शहरासह तालुक्यात वाढणारी कोरोनाबाधित रुग्ण संख्या यामुळे पोलिसांनी या आंदोलनाला चार ते पाच लोकांच्याशिवाय परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या आंदोलनात इतर शेतकरी व कार्यकर्त्यांनी बाजूला उभे राहून सहभाग नोंदविला.
दूध ओतून देण्याऐवजी गरम करून आणलेले दूध त्यात साखर टाकून आंदोलकांनी उपस्थितांसह  शहरातील काही लोकांना वाटप केले.

यावेळी आमदार पाचपुते म्हणाले, सरकार केंद्र सरकार चांगले निर्णय घेत असतानाच राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांवर सोडवण्याची भावना व्यक्त करीत आहे. दूध धंदा अडचणीत असताना शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याऐवजी मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हात बांधून बसले आहेत. यापूर्वीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहते धोरणात्मक निर्णय घेतले होते, याही सरकारने हेच करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी ते न करता शेतकरीविरोधी सरकारी असल्याचे दाखवून दिले आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांचे निवेदन तहसिलदार महेंद्र माळी यांच्याकडे दिले.

संपादन : अशोक मुरुमकर