Ahmednagar : पोलिसांकडून हिंदुत्वविरोधी काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane

Ahmednagar : पोलिसांकडून हिंदुत्वविरोधी काम

श्रीरामपूर : पोलिस यंत्रणांकडून हिंदू संघटनांविरोधी काम सुरू आहे. मात्र, आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत. त्यामुळे हे मनमानीचे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला.

भोकर येथील अपहरण झालेले दीपक रावसाहेब बर्डे यांचा अनेक दिवस उलटूनही, शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले. तसेच, श्रीरामपुरात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांतील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आमदार राणे व माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यात ते बोलत होते.

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राणेंनी, बर्डे प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, तसेच मुलींवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. दीपक याने पोलिसांत येऊन, आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्याची वेळीच दखल घेतली असती, तर ही वेळ आली नसती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपींना मदत केली, असा संशय असून, त्यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राणे, उईके व विविध संघटनांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.

अपहरणाचे सत्य समोर आणू

दीपक बर्डे यांच्या अपहरण प्रकरणाची पोलिस कसून तपासणी करत आहेत. याप्रकरणी काही आरोपी ताब्यातही घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणाचे सत्य समोर आणू, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व उपअधीक्षक संदीप मिटके यांनी यावेळी दिली.

Web Title: Bjp Mla Nitesh Rane On Ahmednagar Police Hindutv Anti Srirampur Morcha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..