esakal | खासदार डॉ. सुजय विखेंचा कायापालट झाला; रस्ता मात्र तसाच राहिला
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MP Sujay Vikhe warned of deprived Bahujanu alliance

कल्याण- विशाखापलट्टणम-निर्मल राष्ट्रीय महरामार्गाचे (61) काम चार वर्षापासुन सुरु आहे. काम रखल्याने रस्त्यावर झालेल्या अपघातामधे दोनशे जीव गेले आहेत. चारशे ते पाचशे जणांना अपंगत्व आले आहे.

खासदार डॉ. सुजय विखेंचा कायापालट झाला; रस्ता मात्र तसाच राहिला

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : कल्याण- विशाखापलट्टणम-निर्मल राष्ट्रीय महरामार्गाचे (61) काम चार वर्षापासुन सुरु आहे. काम रखल्याने रस्त्यावर झालेल्या अपघातामधे दोनशे जीव गेले आहेत. चारशे ते पाचशे जणांना अपंगत्व आले आहे.

ठेकेदार बदलला व खासदार डॉ. सुजय विखे यांनी डिसेंबर 2019 मधे काम पुर्ण करण्याचा जनतेला व प्रसारमाध्यमाला दिलेले आश्वासनाचे काय झाले. रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करा अन्य़था विखेंच्या घरासमोर अंदोलन करु, असा इशारा वंचीत बहुजन आघाडीचे राज्याचे महासचिव किसन चव्हाण यांनी दिला आहे. 

येथील शासकिय विश्राम गृहामधे झालेल्या पत्रकार परीषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाचे पाथर्डी येथील कार्यालयात अधिकारीच नाही. इथला कारभार नगरवरुन व प्रभारी अधिकायामार्फत चालतो. जुना ठेकेदार बदलला नवीन ठेकेदार काम करीत नाही. पाच महीने होवुन गेले रस्त्याचे काम बंदच आहे. शहरातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. अपघात वाढत आहेत. अपघातातील मृताच्या मृत्युस कराणीभुत ठरणा-या अधिकारी व ठेकेदारावर कारवाई झाली पाहीजे. डॉ. सुजय विखे यांनवी लोकप्रतिनिधी म्हणुन केंद्र सरकारकडे बाजु मांडुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. आता ते दुर्लक्ष करीत आहे.

त्यांच्या लोणी येथील घरासमोर आम्ही काळे झेंडे दाखवुन डफडे वाजुन अंदोलन करणार अहोत. विखेंचे निवडणुकीत व त्यानंतर पत्रकार परीषद घेवुन दिलेले आश्वासन हवेत का विरले. ठेकेदारावर पाच महीन्याक काय काम केले, काम उशीरा सुरु करण्याचे कारण काय, काम अपुर्ण असल्याने होणा-या अपघाताला जबाबदार कोण. अशा प्रश्नांची उत्तरे विखे यांनी दिले पाहीजेत. अंदोलनाने विखेंना जाब विचारु. यावेळी इरविंद सोनटक्के, प्रकाश भोसले, प्यारेलाल शेख, रविंद्र म्हस्के उपस्थीत होते. 

संपादन : अशोक मुरुमकर