कर्जत नगरपंचायतीत भाजपला धक्का, चार नगरसेवक राष्ट्रवादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp leader mayor namdev raut joins ncp with four councilors and workers in karjat

कर्जत नगरपंचायतीत भाजपला धक्का, चार नगरसेवक राष्ट्रवादीत

कर्जत (जि. अहमदनगर) : कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात निधी कमी पडू दिला नाही, नामदेव राऊत आणि सहकाऱ्यांनी मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे, इथून पुढे ही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना ताबडतोब पूर्ण करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे.

आज कर्जत नगरपंचायतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी चार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्या-कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बारामती एग्रोचे सुभाष गुळवे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, नगरसेवक बापूसाहेब नेटके व लालासाहेब शेळके, प्रसाद ढोकरीकर,उद्योजक दीपक शिंदे, रवी पाटील,नितीन तोरडमल, भास्कर भैलुमे, रज्याक झारेकरी आदी उपस्थित होते.

नामदेव राऊत म्हणाले की, मिळालेल्या संधीचे सोने करीत शहराचा विकास साधला. आता शहराचा सर्वांगीण विकास आणि स्वप्नातील कर्जत उभारणी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. तसेच जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याकामी मार्गदर्शन मिळणार आहे.

हेही वाचा: 55 गुंठ्यांत मिळविले चक्क लाखोंचे उत्पन्न! युवा शेतकऱ्याची किमया

नामदेव राऊत यांना शहरात मानणारा मोठा वर्ग असून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, मदतीला धावून जाणारा अशी सर्वदूर ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका हर्षदा काळदाते, नगरसेविका उषा राऊत, नगरसेविका वृषाली पाटील यांचे पती प्रा.किरण पाटील, नगरसेवक सुधाकर समुद्र यांचे चिरंजीव सतीश समुद्र,अमृत काळदाते,भाजप अल्पसंख्याक सेल जिल्हा सरचिटणीस इरफान सय्यद, माजी शहराध्यक्ष रामदास हजारे, मार्केट कमिटी संचालक बजरंग कदम, सरपंच दीपक ननावरे, मंगेश नेवसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला .

हेही वाचा: पुरातन साईमंदिराच्या बांधकामात बदल? नवा वाद शक्य

loading image
go to top