farmer
farmeresakal

55 गुंठ्यांत मिळविले चक्क लाखोंचे उत्पन्न! युवा शेतकऱ्याची किमया

सिद्धटेक (जि.अहमदनगर) : केवळ ५५ गुंठ्यांत दर वर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवून येथील तरुण शेतकऱ्याने (farmer) अल्पभूधारक शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर, शेतीमध्ये स्वतः कष्ट करण्याची तयारी व जिद्द ठेवल्यास त्या प्रमाणात उत्पन्न मिळते, याचा वस्तुपाठही तरुणांसमोर ठेवला आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांपुढे आदर्श
प्रशांत वामन सांगळे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सिद्धटेकमध्ये विहिरीतील पाण्यावर ठिबक सिंचन प्रणाली वापरून माळरानावर हिरवाई फुलवण्यात या शेतकऱ्याने यश मिळविले आहे. या यशाबाबत ‘सकाळ’शी बोलताना प्रशांत म्हणाला, की शेतात सध्या डाळिंबाची ४५० झाडे आहेत. केशर आंब्याची ३६ झाडे असून, यंदा कपाशीचीही लागवड केली आहे. याशिवाय उर्वरित क्षेत्रावर कांदा, उडीद अशी पिकेही घेतली जातात. या सर्व पिकांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती देताना प्रशांत म्हणाला, की भगव्या जातीच्या डाळिंबाच्या झाडांना शिफारशीनुसार स्लरी, जीवामृत, तसेच शेणखत दिले जाते. त्यामुळे डाळिंबांची चमक व रंग सुधारण्यास चांगलीच मदत झाली. ५०० ते ६०० ग्रॅमपर्यंत फळांचे वजन वाढल्याने दरही चांगला मिळाला. यामध्ये बहरांचे नियोजनही फायद्याचे ठरल्याचे प्रशांतने आवर्जून सांगितले.

farmer
'तो' कायदा आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील - राज ठाकरे



औजारांपासून अधिकचे उत्पन्न
सध्या सर्वत्र मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणावर सर्वांचाच भर असल्याने, त्यांची गरज ओळखून पेरणी, कोळपणी, रोटर, मळणी यंत्र, कांद्यासाठी सरी यंत्र, गादीवाफा यंत्र अशी यंत्रे भाडेतत्त्वावर देऊन शेतकऱ्यांची ऐन वेळची गरज पूर्ण केली. त्यामुळे या औजारांपासून अधिकचे उत्पन्न मिळविण्यास मदत झाल्याचे प्रशांतने सांगितले.

इतरांकडून अनुकरण
काटेकोरपणे नियोजनाला शेतीमध्ये महत्त्व असते आणि हेच माझ्या यशाचे गमक आहे, हे सांगतानाच, इतरांनीही आपले अनुकरण केले व मीही इतरांना करता येईल तेवढे चांगले मार्गदर्शन करत असतो, असे प्रशांतने सांगितले.

farmer
केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी - भुजबळ


पत्नीची साथ
खते, कीडनाशकांच्या फवारणीसाठी विविध औषधांच्या मात्रा तयार करणे, त्यांची फवारणी करणे, ट्रॅक्टरच्या साह्याने शेतातील विविध प्रकारची कामे पत्नी ज्योत्स्ना अगदी सहजपणे करत असल्याची माहितीही प्रशांतने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com