

BJP’s Agenda: Hoist the Flag on Ahilyanagar Zilla Parishad
Sakal
अहिल्यानगर: पूर्वी लाल सलाम करणारा जिल्हा काँग्रेसमय झाला. आता तो भाजपच्या भगव्या रंगात रंगून गेला आहे. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्याने राजकीय कूस बदलल्याने हे स्थित्यंतर घडले. काँग्रेस-राष्ट्रवादीची एकेक सत्तास्थाने त्यांनी काबीज केली. नगरपालिका, महापालिका यशानंतर भाजपने आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे मोर्चा वळवलाय.