...अन्यथा दूधाचे टँकर फोडू; कोणी दिलाय इशारा वाचा

सुनील गर्जे
Wednesday, 22 July 2020

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी (ता. २२) नेवासे तालुका भाजपच्या वतीने दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले. दरम्यान तहसिलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले

नेवासे (अहमदनगर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी (ता. २२) नेवासे तालुका भाजपच्या वतीने दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले. दरम्यान तहसिलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा : ब्रेकिंग! दूधला दर नसल्याने नगर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या
भाजपचे तालुका अध्यक्ष नितीन दिनकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २२) नेवासे येथील खोलेश्वर गणपती चौकात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा. दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला ३० रुपयांचा दर द्यावा या मागण्यांसाठी कार्येकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले.  दरम्यान हे सर्व आंदोलकांनी येथून सामाजिक अंतर ठेवून तहसील कार्यालयापर्येंत पायी मोर्चा काढत कोपरा सभा घेतली.
नितीन दिनकर म्हणाले,  राज्य सरकारने दुधाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा दुधाचे टँकर अडवून ते फोडण्यात येतील. यावेळी मुरकुटे यांनी दुधाच्या भाव वाढीबाबत शासन उदासीन असल्याची टीका केली.
आंदोलकांचे निवेदन तहसीलदार रुपेश सुराणा यांनी स्वीकारले.  यावेळी शहराध्यक्ष मनोज पारखे, राजेंद्र मापारी, उदयकुमार बल्लाळ, डॉ. लक्ष्मण खंडाळे, ज्ञानेश्वर टेकाळे, भास्कर कणगरे,  सचिन नागपुरे,   निरंजन डहाळे,   सतीश गायके,  दत्तात्रय गीते आदी सहभागी झाले होते.
संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP statement to tehsildar in Nevasa taluka for milk rate