राहुरी पालिकेची निवडणूक भाजपच्याच चिन्हावर लढवू - कर्डिले

शिवाजीराव कर्डिले
शिवाजीराव कर्डिले
Updated on

राहुरी : "महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. २६) सकाळी साडेदहा वाजता राहुरी येथे बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्गावर भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन केले जाईल. तसेच आगामी राहुरी नगरपालिकेची निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावर लढविली जाईल." असे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

राहुरी येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्‍तम आढाव होते. जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, चाचा तनपुरे, शामराव निमसे, शिवाजी सोनवणे, सुभाष गायकवाड, रवींद्र म्हसे उपस्थित होते. (BJP will contest Rahuri municipal elections)

शिवाजीराव कर्डिले
हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

कर्डिले यांनी बैठकीत मंत्री तनपुरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, "राहुरी नगरपालिका पिढ्यानपिढ्या ताब्यात असताना नगर तालुक्यात नगरपालिका काढायला निघाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार. अशी अफवा उठवून, भीती घालून मते मिळविली. आता सरकार तुमचे आहे. तुमचे मामा त्या खात्याचे मंत्री आहेत. बीडला पाणी जाणार असल्याचा एक तरी लेखी पुरावा जनतेला द्यावा. अन्यथा राहुरीच्या जनतेची माफी मागावी."

"राहुरी कारखान्याच्या शेतकरी, कामगार व कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत मदत केली. परंतु, कारखाना चालू करण्यासाठी कर्डिलेंकडे कशाला जाता. माझ्याकडे या. असे तनपुरे म्हणतात. त्यांना आव्हान आहे. त्यांनी कारखान्याला शंभर कोटी रुपयांच्या कर्जात घातले. ते कर्ज बँकेत भरा. माझ्यासह खासदार सुजय विखे व कारखान्याचे संचालक मंडळ तुमच्या वाड्यावर येऊ." असेही कर्डिले यांनी सांगितले.(BJP will contest Rahuri municipal elections)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com