Maharashtra politics: कोपरगावातील भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांची श्रध्दा-सबुरी फळाला; विधानपरिषदेसाठी शिफारस, वाढदिवशीच गिफ्ट!

Kopargaon BJP leader gets MLC recommendation news: भाजप युवानेते विवेक कोल्हे यांना फडणवीसांचा दिलेला शब्द पूर्ण; कोपरगावातील राजकीय समतोल साधत वाढदिवशीच विधानपरिषदेची संधी
Birthday Gift for BJP’s Vivek Kolhe as He’s Nominated for Legislative Council

Birthday Gift for BJP’s Vivek Kolhe as He’s Nominated for Legislative Council

sakal

Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: कोपरगावातील भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांची मागील विधानसभा निवडणुकीतील सबुरी आणि मुख्यमंत्री देवाभाऊंवरील श्रद्धा त्यांच्या कामी आली. आज भाजपने त्यांच्यासाठी विधानपरिषदेचा दरवाजा खुला केला. त्यांच्या पुढाकारातून कार्यान्वित झालेला सहकार क्षेत्रातील देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोपरगावात लावलेली हजेरी आणि पाठोपाठ कोपरगाव पालिकेची निवडणूक जिंकून त्यांनी पक्षाला दिलेले गिफ्ट. या त्यांच्या दृष्टीने जमेच्या बाजू ठरल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com