भाजपचे चाणक्य रोहित पवारांच्या भेटीला, चर्चा तर होणारच!

BJP's Chanakya Prasad Dhokrikar to meet Rohit Pawar
BJP's Chanakya Prasad Dhokrikar to meet Rohit Pawar

कर्जत: कर्जत नगर पालिकेच्या निवडणुकीची सध्या धामधुम आहे. आपल्याला नगरसेवक मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. राजकीय पक्षही त्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी आणि भाजपने कंबर कसली आहे. असे असताना भाजपच्या राजकीय चाणक्यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चा झडत आहेत.

 ंया भेटीचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पडसाद उमटत आहेत. या भेटीमागील नेमके काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. 

येथील नगरपंचायतीची मुदत संपली आहे. तेथे प्रशासक नियुक्त आहेत. सध्या निवडणुकीपूर्वीच रणधुमाळी सुरू झाली आहे. ही मार्च महिन्यात निवडणूक होण्याची शक्‍यता आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नगरपंचायत सत्ता खेचून आणण्यासाठी, तर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरपंचायत सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.

कर्जत नगरपंचायत भाजपच्याच ताब्यात राहील, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी जोगेश्वरवाडी येथील कार्यक्रमात केले होते. तसेच काल शहरात वसुंधरा व स्वच्छता अभियानात शहर स्वच्छता करणारी विविध सामाजिक संघटनांच्या स्वच्छता दूताबरोबर श्रमदान केले होते.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस व कर्जतच्या राजकीय क्षेत्रातील चाणक्‍य म्हणून ओळखले जाणारे प्रसाद ढोकरीकर यांनी आज कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. त्यांचा फेटा बांधून सन्मानही केला.

या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव, भाजप सोशल मीडियाचे विक्रांत ढोकरीकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, युवक नेते ऋषिकेश धांडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार, उमेश जेवरे, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर हे भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते माजी मंत्री राम शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळेच आमदार रोहित पवार यांच्या भेटीचे इंगित काय असा काय? 

या भाजपवाले आपले स्वागत आहे...

ढोकरीकर पवारांच्या भेटीला गेल्यानंतर भाजपवाले या आपले स्वागत आहे असे म्हणून केलेले हस्तांदोलन, दोघांनी संक्रातीच्या मुहूर्तावर एकमेकांना दिलेले तीळगूळ घ्या गोड बोला असे म्हणत दिलेल्या शुभेच्छांमुळे तर्कवितर्क काढले जात आहेत. 

येत्या 22 तारखेला नवीन दुकान सुरू करीत आहे. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. प्रथमच भेटत असल्याने व आदिनाथ साखर कारखाना चालविण्यास घेऊन तालुक्‍यातील बावीस गावातील उउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल कुटुंबियांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यात गैर काय?

- प्रसाद ढोकरीकर, जिल्हा संघटन सरचिटणीस, भाजप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com