

Inspiring Success: Working Officer Sonal Shah Achieves MPSC Milestone
Sakal
शेवगाव: शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांची जीएसटी विभागातील असिस्टंट कमिशनर पदी निवड झाली आहे. नोकरी करत असतानाही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवून त्यांनी हे यश मिळवले आहे.