esakal | थोरात सहकारी साखर कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Boiler lighting ceremony of Thorat Cooperative Sugar Factory on Tuesday

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2020- 2021 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवारी (ता. 29) सकाळी ९ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कांचन थोरात यांच्या हस्ते होणार आहे.

थोरात सहकारी साखर कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2020- 2021 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवारी (ता. 29) सकाळी ९ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कांचन थोरात यांच्या हस्ते होणार आहे.

विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभासाठी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वाधिक भाव देणारा अग्रगण्य कारखाना म्हणून संगमनेरचा थोरात सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. दिवंगत भाऊसाहेब थोरात यांची कडवी शिस्त, काटकसर, पारदर्शकता व उत्कृष्ट व्यवस्थापन आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दैनंदिन साडेपाच हजार मेट्रीक टन गाळप व 30 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या या कारखान्याने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.

कोरोना संकटात कारखान्याने तालुक्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी वसंत लॉन्स येथे अद्ययावत 300 बेडचे कोविड सेंटर सुरु केले असून, कारखाना सातत्याने या संकटकाळात मदतीसाठी सज्ज आहे. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे उपाध्यध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image