
बोधेगाव : बालमटाकळी गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना मंगळवारी (ता.८) उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शेजारील पडक्या जागेतून हिरालाल धोंडलकर यांच्या घरात प्रवेश करत चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले. कानातील सोन्याच्या वस्तू निघत नसल्याने चोरट्यांनी हिसकावल्याने महिलेच्या कानाला दुखापत झाली आहे.