

Seven Bullets End Bunty Jahagirdar’s Life; CCTV Captures Assailants
Sakal
श्रीरामपूर : सेंट लुक रुग्णालयाच्या ओपीडी गेटसमोर बुधवारी (ता.३१) दुपारी ३ वाजून ५ वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार (रा. श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात बंटी यांना पाच गोळ्या लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अहिल्यानगर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे मित्र अमीन हाजी हेदेखील जखमी झाले.