

राहुरी : वरवंडी येथे फायटर विमानातून निसटलेला एक बॉम्ब जमिनीत सात फूट खोलवर रुतलेला आढळला. शुक्रवारी दुपारी भारतीय स्थलसेना व वायुसेनेच्या अधिकाऱ्यांच्या दोन पथकांनी घटनास्थळी पाहणी केली. वायुसेनेचा बॉम्ब नाही. बॉम्ब जिवंत आहे. नाशिकच्या तोफखाना विभागाचे अधिकारी बॉम्ब काढतील, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.