
शिर्डी: श्री साईबाबा संस्थानला काल (ता. २३) सकाळी आठ वाजता प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये साई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. खबरदारीची उपाय म्हणून साई मंदिराची बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली. प्रत्यक्षात तसे काहीही आढळून आले नाही.