esakal | यंदा पुस्तकेच पाहतायेत विद्यार्थ्यांची वाट
sakal

बोलून बातमी शोधा

Books available; But that is not the decision of the schools

दरवर्षीच शाळेच्या पहिल्या दिवशी या पुस्तकांचे वितरण केले जाते. अनेक शाळांना पहिल्या दिवशी पुस्तके वितरणाला मिळाली नसल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी पुस्तके उपलब्ध झाली, तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे पुस्तके शाळांमध्येच पडून आहेत.

यंदा पुस्तकेच पाहतायेत विद्यार्थ्यांची वाट

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर  : शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करण्याचे नियोजन केले जात असले, तरी ते पूर्ण होत नव्हते. अनेक शाळांना पहिल्या दिवशी पुस्तके वितरण करता आलेले नाही. परंतु यंदाच्या वर्षी पुस्तके उपलब्ध होऊनही ती वितरणासाठी शाळाच उघडल्या नसल्याने तशीच पडून राहणार आहेत.

हेही वाचा ः सौ शेरी, एक संगमनेरी पण आता कोरोना ठरतोय भारी... बाधित सेंच्युरीच्या वाटेवर

राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, तसेच खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जात आहेत. 

दरवर्षीच शाळेच्या पहिल्या दिवशी या पुस्तकांचे वितरण केले जाते. अनेक शाळांना पहिल्या दिवशी पुस्तके वितरणाला मिळाली नसल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी पुस्तके उपलब्ध झाली, तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे पुस्तके शाळांमध्येच पडून आहेत.

क्लिक करा ः वजन, दराची माहिती मोबाईलवर

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत एकूण चार लाख 18 हजार 113 विद्यार्थी आहेत. यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत दोन लाख 73 हजार 57, तर सहावी ते आठवीचे एक लाख 45 हजार 53 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. ही पुस्तके आता शाळांमध्ये पोच करण्यात आली आहेत. मात्र, शासनाकडून अद्याप शाळा सुरू करण्याबाबत कोणताच अध्यादेश शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही. 

अवश्य वाचा ः विजेने घेतला 14 जनावरांचा बळी

याबाबत सोशल मीडियावर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत शाळा सुरू होणार असल्याचे प्रत्येक जण आपले मत व्यक्‍त करीत आहे. याबाबत शासनाकडे जुलै महिन्यात 11 वी ते 12 वी, ऑगस्टमध्ये पाचवी ते दहावी आणि सप्टेंबरमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात यावेत, असा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहे. याला मात्र शिक्षण विभागाकडून दुजोरा देण्यात आला नाही. 

पुस्तके वाटणार का? 
शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यावर अनेक जण मते व्यक्त करीत असली, तरी शाळांबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. शाळा सुरू करण्याचा निर्णय न होता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकांचे वितरण केले जाईल का, असा सवाल आता पालकांमधून उपस्थित केला जात आहे. 

95 टक्‍के पाठ्यपुस्तके वितरणासाठी उपलब्ध असून, उर्वरित पुस्तके येत्या दोन दिवसांत येणार आहेत. शाळा सुरू करण्याचा सरकारकडून कोणताही अध्यादेश अद्यापही प्राप्त झालेला नाही. 
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग 
 

loading image