
कल्याण रस्ता परिसर नगर शहराच्या अत्यंत जवळचा भाग असल्याने येथे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत.
अहमदनगर : कल्याण रस्ता परिसर नगर शहराच्या अत्यंत जवळचा भाग असल्याने येथे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. नव्याने परिसर विकसित होत असल्याने मूलभूत सोयी सुविधांपासून या भागात विकास कामांचे नियोजन करावे लागत आहे.
परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार केला असून निधीच्या उपलब्धतेनुसार विकास कामांचा अनुशेष भरुन काढणार आहे, असे प्रतिपादन माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी केले.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गणेशनगर परिसरातील 450 मिलीमीटर व्यासाची व 42 लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटार कामाच्या प्रारंभा प्रसंगी ते बोलत होते. नगरसेवक श्याम नळकांडे, संजय शेंडगे, नगरसेविका पुष्पा बोरुडे, रोहिणी शेंडगे, सचिन शिंदे, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे आदी उपस्थित होते.
बोरूडे म्हणाले, की महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सहकार्याने महापालिकेच्या माध्यमातून या भागात अडीच कोटींची विकास कामे मंजूर आहेत. मी नगरसेवक असताना बालिकाश्रम परिसराचा विकास कामांतून कायापालट केला आहे. निवडणुकी वेळी कल्याण रस्ता परिसरातील नागरिकांना विकास कामांचा शब्द आम्ही सर्व नगरसेवकांनी दिला होता. त्याची वचनपूर्ती आम्ही आता करत आहोत.
संपादन : अशोक मुरुमकर