

Rajesh Tope Claims Joint NCP Fight Will Yield Positive Results
Sakal
सिद्धटेक: काही दिवसांतच राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रच लढविल्या जाणार असून, हा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर झाला आहे. तसेच या निर्णयाचे चांगले परिणाम दिसतील, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.