Organ Donation: मृत्यूच्या दुःखातही माणुसकी जिंकली! ब्रेनडेड दीपक यांच्या अवयवदानातून चार रुग्णांना नवजीवन, कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी..

Deepak Mulekar Organ Donation Gives New Life To Four Patients: ब्रेनडेड दीपक मुळेकर यांच्या अवयवदानातून चार रुग्णांना नवजीवन; दुःखाच्या क्षणी पत्नी व कुटुंबीयांचा माणुसकीचा मोठा निर्णय, प्रवरा रुग्णालयात यशस्वी प्रक्रिया
Maharashtra Organ Donation Story Brain Dead Deepak Mulekar Gives Four Patients A New Chance At Life Through Donation

Maharashtra Organ Donation Story Brain Dead Deepak Mulekar Gives Four Patients A New Chance At Life Through Donation

sakal

Updated on

शिर्डी: ब्रेन डेड झालेल्या दीपक भानुदास मुळेकर (वय २८, रा. दुर्गापूर, ता. राहाता) युवकाच्या पत्नीसह अन्य कुटुंबीयांनी दुःख बाजूला ठेवून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. आज लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात अवयवदानाची वैद्यकीय प्रक्रिया पार पडली. दोन्ही फुफ्फुसे पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयात, यकृत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात, तर दोन्ही मूत्रपिंडे नाशिक येथील किंग्स मानवता रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आली. दुपारी तीनच्या सुमारास हे अवयव घेऊन रुग्णवाहिका येथून रवाना झाल्या. पोलिस यंत्रणेने त्यासाठी लोणी ते पुणे या अंतरात ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिला. या अवयवदानातून चार गरजू रुग्णांना नवजीवन मिळेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com