
शिर्डी : तालुक्यातील तरकसवाडी येथील कैलास अशोक तरकसे (वय ३५) मोटारसायकलवरून घराकडे परतत असताना अपघात झाला. त्यांना उपचारासासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डोक्यास मार लागल्याने त्यांचा मेंदू काम करेनासा झाला. डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले.