ब्रेकिंग ः पोलिस गुंडाला म्हणाले, तुझा आज कार्यक्रमच..मग त्यानेच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

तेथे पोलीस अाल्याची चाहुल लागताच आरोपीने तेथून आपल्या दुचाकीकडे धूम ठोकली. मात्र, त्याच वेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केल्याने त्याने गाडी सोडून मंदिराच्या पाठीमागून पळ काढला. पळताना...

पारनेर ः सिनेस्टाईल पाठलाग करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गावठी कट्टाधारकास सुमारे तीनशे मीटर पाठलाग केला. आरोपी पुढे अन पोलीस मागे असा थरार सुरू होता. 

आरोपीने पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दोन ते तीन वेळा गोळीबार करण्यासाठी कट्टा रोखला. मात्र, पोलिसांनीदेखील पिस्तूल रोखत म्हणाले... आता तू थांबला नाहीस तर तुझा कार्यक्रमच. मग त्यानेच..

हेही वाचा - मुलगाच म्हणतो, आईचे अनैतिक संबंध

या बाबत माहिती अशी की, सांगवी सूर्या येथे एक गावठी कट्टाधारक आहे. त्याची  गावात व परीसरात मोठी दहशत आहे. तो आज (ता. 30 ) दुपारी विठ्ठल मंदिराजवळ असणा-या कार्यक्रमासाठी येणार असल्याचे समजल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास सांगवी सूर्या गाठले.

तेथे पोलीस अाल्याची चाहुल लागताच आरोपीने तेथून आपल्या दुचाकीकडे धूम ठोकली. मात्र, त्याच वेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केल्याने त्याने गाडी सोडून मंदिराच्या पाठीमागून पळ काढला. पळताना त्याने आपल्याजवळील गावठी कट्टाही बाहेर काठला. 

आरोपी पुढे व पोलिस मागे असा चित्तथरारक पाठलाग सुमारे तीनशे मीटर सुरू होता. त्या वेळी आरोपीने पुढे पळत असताना आपल्या हातातील गावठी कट्टाही पोलिसांवर दोन वेळा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान पोलिसांनीही आपले पिस्तूल बाहेर काढून त्यास अाता तू थांबला नाही तर...असा दम दिला. त्यानंतर तो पळायचे थांबला.

गावकरी असे म्हणतात...

पोलिस म्हणतात, त्याने गोळीबार केला नाही. तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात त्याने हवेत दोन वेळा गोळीबार केला. त्याच्याकडे दोन कट्टे आहेत. अवैध धंद्यात तो माहीर आहे. बाबा नावाने तो परिसरात फेमस आहे. मात्र, नेमके काय घडले. फिर्यादीनंतरच समजेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BREAKING: A gangster fired on police in Parner