वर्षात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून सोनईकरांना सात कोटींचा गंडा

विनायक दरंदले
Thursday, 14 January 2021

उज्वलम अॅग्रो मल्टीस्टेट, माऊली मल्टीस्टेट सोसायटी, संकल्पसिध्दी इंडिया प्रा. लि., प्राॅफिट टिचर फ्लाय हाॅलिडे या संस्थेचे नाव सांगून एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे अमिष दाखविण्यात आले.

सोनई (जि.अहमदनगर) ः एका वर्षात दामदुप्पट व सोबत आकर्षक विमान प्रवासाचे अमिष दाखवून सोनई परीसरात सहा कोटी ८१ लाख रुपायांचा गंडा घातल्या प्रकरणी सहा जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनई येथील आण्णासाहेब मिठ्ठू दरंदले यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून विष्णु रामचंद्र भागवत रा.दवंडगाव (जि.नाशिक), नीलेश जनार्दन कुंभार रा.मंचर (जि.पुणे), सुरेश सीताराम घंगाडे (रा. तळेगाव जि.पुणे), राजेंद्र वामन देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे (रा.कोतुळ, जि.नगर), शांताराम अशोक देवतरसे (रा.सोनई) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उज्वलम अॅग्रो मल्टीस्टेट, माऊली मल्टीस्टेट सोसायटी, संकल्पसिध्दी इंडिया प्रा. लि., प्राॅफिट टिचर फ्लाय हाॅलिडे या संस्थेचे नाव सांगून एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे अमिष दाखविण्यात आले.

हेही वाचा - अधिकाऱ्याने नाद केला आणि अंगलट आला

सहभागी व्यक्तीला जमिन व विमान प्रवासाचे अश्वासन देण्यात आले.सन २०१७ ते २०१९ दरम्यान सोनई, मुळा कारखाना, श्रीरामवाडी व परीसरातून पैसे नेले. मुदत संपुनही दामदुप्पट रक्कम मिळाली नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपींनी सोनई, शिर्डी, आळेफाटा येथील हाॅटेल 
व लाॅजवर बैठका घेवून दुप्पट पैशाचे अमिष  दाखविले
होते. अनेकांनी जमिनी विकून व घरातील सोने मोडून
पैसे गुंतवले  होते. सोनईतील अनेक जण त्यावेळी  पटवापटवी करण्यासाठी कार्यरत होते. दीड वर्ष उलटूनही पैसे मिळत  नसल्याने  फिर्याद  देण्यात  आली आहे. अधिक तपास सहायक  पोलिस निरीक्षक  रामचंद्र कर्पे करत आहेत. 
      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A bribe of Rs 7 crore to Sonaikar by showing the lure of double the amount in a year