Groom left shocked as the bride flees with her accomplices after the wedding scam is revealed by a guest.esakal
अहिल्यानगर
Srigonde fraud : अरे.. हिच्यासोबत तर माझंपण लग्न झालतं!: पाहुण्याच्या खुलाशाने फसवणूक उघड; नवरी सहकाऱ्यांसह पळली
Wedding Scam Unveiled : लग्नानंतर सोळाव्याच्या कार्यक्रमाला आलेल्या एका पाहुण्याने नवरीला पाहिल्यानंतर ‘माझंपण हिच्यासोबतच लग्न झालतं’ असे सांगितल्याने एकच खळबळ उडाली. त्यातून लग्नाच्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला.
श्रीगोंदे : लग्नानंतर सोळाव्याच्या कार्यक्रमाला आलेल्या एका पाहुण्याने नवरीला पाहिल्यानंतर ‘माझंपण हिच्यासोबतच लग्न झालतं’ असे सांगितल्याने एकच खळबळ उडाली. त्यातून लग्नाच्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आपले भांडं फुटल्याचे लक्षात येताच नवरीने आपल्या सहकाऱ्यांसह तिथून पळ काढला.

