
Bride’s father handing over a ₹21,000 cheque to the Sakal Relief Fund team, setting an example of true social responsibility.
Sakal
राहुरी: मुलीच्या सुपारी-कुंकवाच्या कार्यक्रमात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वधुपित्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. रविवारी कार्यक्रमात ‘सकाळ’ रिलिफ फंडला २१ हजार ३६९ रुपयांचा धनादेश देवून वधुपित्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला. सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.