
राहुरी: तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले. या गुन्ह्याच्या तपासात आरोपीच्या भावाने मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार राहुरी पोलिसांनी मुख्य आरोपीच्या भावाला अटक केली. त्याला राहुरी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.