सात वर्षांची चिमुरडी बंधूप्रेमासाठी बनली वाघिण... घाबरून बिबट्या पळाला पाय लावून

The brother was rescued from the leopard's jaw
The brother was rescued from the leopard's jaw
Updated on

अमरापूर : अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकल्या भावाला वाचविण्यासाठी सात वर्षाच्या लहानग्या बहीणीने थेट बिबट्याशीच दोन हात केले. आणि भावाला साक्षात म्रुत्यूच्या दाढेतून ओढून काढले.तिचा प्रतिकार पाहून बिबट्या पाय लावून पळाला. 

या झटापटीत मुलाचा एक कान तुटला, डोक्यात बिबट्याचे दात शिरल्याने जखमा झाल्या. मात्र, बहीणीच्या प्रसंगावधाने आणि धाडसाने चिमुरड्या भावाचे प्राण मात्र वाचले. बहिणीच्या वेड्या मायेने थेट बिबट्याशीच केलेला जीवघेणा संघर्ष मात्र परिसरात चर्चेचा विषय ठरला.

वाघोली (ता. शेवगाव) येथील पवार-शेळके वस्तीवर शनिवारी रात्री घडलेल्या ही थरारक घटना घडली. परिसरात वस्तीवर राहणाऱ्या संतोष केसभट यांच्या घरासमोरील अंगणात त्यांचा तीन वर्षाचा लहानगा मुलगा शंभू बहीण स्वप्नाली हिच्यासोबत शनिवार रात्री सात-आठच्या सुमारास खेळत होता.

असा झाला थरार

बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शंभूवर हल्ला केला. त्यास डोक्याच्या बाजूने जबड्यात पकडून पळण्याच्या बेतात असतानाच चिमुकल्या स्वप्नालीने बिबट्याची भीती न बाळगता भाऊ शंभूचा एक पाय सारी शक्ती पणाला लावून ओढून धरला. त्यामुळे बिबट्याला तोंडातील मुलास घेऊन पळता येईना. 

बिबट्या डोक्याकडून तर बहीण पायाकडून भावास जोरजोरात ओढत असताना झालेल्या झटापटीत दारातील पडवीच्या लोखंडी खांबाला धक्का लागून मोठा आवाज झाला. या आवाजाने संतोष केसभट घरातून बाहेर आले. त्यांनी हातात काठी घेत बिबट्यावर चाल केली. शिकार काही हाती येत नसल्याने बिबट्याने तोंडात पकडलेल्या शंभूला सोडून दिले.

स्वप्नाली दुसरीत शिकते

या हल्ल्यात त्या मुलाचा एक कान तुटला अाहे. डोक्यात बिबट्याचे दात घुसल्याने त्यास नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
चिमुकल्या तीन वर्षाच्या भावाचे प्राण वाचविणारी स्वप्नाली केसभट ही येथील पवार शेळके वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिकते. तिच्या धाडसाचे आमदार मोनिका राजळे यांनी भेट घेऊन कौतूक केले.

वाघोली परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. नारायण दातीर व सखाहारी घोंगडे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून शेळीस व कुत्र्यास शिकार बनवले आहे. युवक कार्यकर्ते उमेश भालसिंग, सरपंच बाबासाहेब गाडगे यांनी  वनविभागाच्या अधिका-याशी संपर्क केल्यानंतर या परीसरात एक पिंजरा लावला आहे. मात्र, मनात भीती कायम आहे.

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com