

Shevgaon Dacoity Case: Brutal Assault on Women, Police Launch Manhunt
Sakal
बोधेगाव: शेवगाव तालुक्यातील बोधेगाव-येथील बोधेगाव-बाडगव्हाण रस्त्यावरील खिळे, वैद्य व खंडागळे वस्तीवर अवघ्या एका तासात सहा ते आठ तोंड बांधलेल्या दरोडेखोरांनी चार घरांवर धाडसी दरोडे घातले. चाकू, कटावणी, तलवारीचा धाक दाखवत नागरिकांना मारहाण करत सोन्या-चांदीसह लाखोंचा ऐवज लंपास केला. यामध्ये वैद्य वस्तीवर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.