

Police escorting the arrested accused in the Bunty Jahagirdar murder case after their capture on Samruddhi Expressway.
sakal
श्रीरामपूर: अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात अहिल्यानगर पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर दुचाकी सोडून चारचाकीने समृद्धी महामार्गावरून पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या दोन मुख्य मारेकऱ्यांना पोलिसांनी गुरुवारी (ता.१) पहाटे कोकमठाण (ता. कोपरगाव) परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. या हत्येमागील मुख्य सूत्रधारांचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलिस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी भेट देत माहिती घेतली.