
टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठ परीसरातील खानापुर शिवारात भोपळे वस्तीवर बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरुमच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून हत्यारांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील व घरातील दागिने, कपाटातील रोख रक्कमेसह पावणे दहा लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात विजयादेवी लक्ष्मण भोपळे यांनी फिर्याद दाखल केली.