Ahilyanagar : बस वाहकासह चालकाला मारहाण; शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
Bus Driver and Conductor Attacked : आव्हाड व जाधव हे पाथर्डी ते अहिल्यानगर बस घेऊन अहिल्यानगरला चालले होते. आठवडे बाजारचा दिवस असल्याने बस हळू जात असताना शहरातील न्यायालयाच्या इमारतीसमोर एका अनोळखी तरुणाने बस थांबवली.
Bus driver and conductor assaulted, leading to a police case filed for obstructing government work."Sakal
पाथर्डी : पाथर्डीहून नगरला प्रवासी बस घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकासह वाहकास एका तरुणाने जबर मारहाण करण्याची घटना बुधवारी (ता. १२) घडली. या घटनेत बसचालक बाबाजी विश्वनाथ आव्हाड व वाहक सुभाष जयवंत जाधव हे जखमी झाले आहेत.