Ahilyanagar : व्यावसायिकांचे पाचव्या दिवशी उपोषण मागे: नीलेश लंके यांची मध्यस्थी; प्रशासनाकडून लेखी आश्वासन
सोमवार त्यांना शासकीय जागेबाबत वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाची मंजुरी मिळण्याकरिता शासनाच्या प्रचलीत व कायद्यानुसार पाठपुरावा करण्यात येईल, असे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी लेखी आश्वासन दिले.
"Business owners end their five-day hunger strike after receiving written assurance from the administration, mediated by Nilesh Lanke."Sakal
शेवगाव : शहरातील अतिक्रमणे काढलेल्या व्यावसायिकांचे तत्काळ पुनर्वसन करावे, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य काँ. संजय नांगरे, प्रदीप मेहेर, राजेंद्र मेहेर, शब्बीर पठाण, संजय गुजर उपोषणास बसले होते.