

Horror on Pilgrimage Route: Fatal Crash Near Shani Shingnapur
Sakal
राहुरी: राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर पिंप्री अवघड शिवारात मंगळवारी सायंकाळी चार वाजता टेम्पो ट्रॅव्हलर बस व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये शनिशिंगणापूरला चाललेल्या भाविकांचा समावेश आहे. मृत्यू व जखमी रिक्षामधील आहेत. बसमधील दहा ते बाराजण किरकोळ जखमी झाले आहेत.