
पारनेर ः खासगी दूधसंकलन करणाऱ्या दूध संघांनी अवघ्या 22 ते 23 रुपये दराने दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूधव्यवसाय संकटात सापडला आहे. मात्र, विक्रीच्या दरात कपात केली नाही. ग्राहकांना आताही 40 ते 48 रुपये प्रतिलिटर दराने दूध विकले जात आहे. यामुळे दूधउत्पादक शेतकरी व ग्राहकांची लूट होत आहे. (Buy only 22 liters of milk from private milk centers)
कोरोना संकट व "लॉकडाउन'च्या काळात शेतीमालाला भाव मिळत नाही. भाजीपालाही शेतातच सडून चालला आहे. अशा स्थितीत दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पशुखाद्याचे दर वर्षभरात 25 ते 35 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, दुधाचे दर कमी होत आहेत. दूधउत्पादक शेतकऱ्यांना दूधउत्पादनासाठी 35 रुपये प्रतिलिटर खर्च येतो. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर 13 रुपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागत आहे.
सरकारने दुधास किमान 35 रुपये भाव देणे अपेक्षित आहे. दूधउत्पादक शेतकऱ्यांची तशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केल्यावर विक्रीचा दर दुप्पट होतो. भेसळयुक्त दुधाच्या भीतीने अनेकांनी दूध व दुधाचे पदार्थ खाणे सोडून दिले. शेतकऱ्यांनी शेतीस जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू केला. दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शहरात दूधविक्रेत्याला लिटरमागे किमान सहा रुपये कमिशन व 10 लिटरवरील दुधावर एक लिटर दूध मोफत, अशी 10 अधिक 1 स्कीम राबविली जात आहे. म्हणजे दूधविक्रेत्याला लिटरमागे 10 ते 12 रुपये कमिशन मिळत आहे. यातून दूधउत्पादक शेतकरी व ग्राहक या दोघांचीही लूट होत आहे.
हॉटेल व्यवसाय बंद आहे. मिठाई, तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्रीही कमी झाली आहे. त्याचा परिणाम दुधाच्या खपावर झाला आहे. दूध खरेदी करणाऱ्या संघांनी खरेदी दर कमी केला; मात्र विक्रीदर तसाच ठेवला. त्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत.
- उत्तम गवळी, दूधउत्पादक शेतकरी
(Buy only 22 liters of milk from private milk centers)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.