esakal | आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी ‘उभारी’
sakal

बोलून बातमी शोधा

Campaign to help the families of suicidal farmers

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतलेला धोरणात्मक निर्णय व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन व नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट देवून त्यांना शासनाच्या जास्तीत जास्त सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा करणे हा ‘उभारी अभियाना’चा महत्त्वाचा उद्देश आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी ‘उभारी’

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतलेला धोरणात्मक निर्णय व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन व नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट देवून त्यांना शासनाच्या जास्तीत जास्त सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा करणे हा ‘उभारी अभियाना’चा महत्त्वाचा उद्देश आहे. 

शासनाच्या विविध योजना शासकिय कर्मचाऱ्यांमार्फत या कुटुंबांना लवकरात लवकर मिळवून देणार असल्याची ग्वाही तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. उभारी या अभियानाच्या तालुक्यातील देवकौठे येथे शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. 

देवकौठे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सोमनाथ कहांडळ यांच्या कुटुंबीयांच्या भेट घेऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. देवकौठे व वडगांव लांडगा येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबियांना शासनाच्या जास्तीत जास्त सुविधांचा लाभ देण्यासाठी प्रशासन अधिक गतीने काम करेल अशी ग्वाही तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

उभारी या अभियानांतर्गत नाशिक विभागात 2 ते 9 ऑक्टोबर 2020 या काळात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची सध्याची अवस्था, आतापर्यंत मिळालेल्या योजनांचा लाभ, स्वयंरोजगार देण्यासाठी प्रयत्न याची माहिती प्रत्यक्ष कुटूंबियांची भेटून घेण्यासाठी हा शासकीय कार्यक्रम सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. 

यासाठी स्थानिक अधिकार्‍याची नेमणूक करुन त्या कुटूंबियांच्या मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. या वेळी भारत मुंगसे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, नामदेव कहांडळ, दशरथ कहांडळ, अनिल गाजरे, शत्रुघ्न मुंगसे, तलाठी अमोल गडाख, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक स्मिता सहाने, रोहिदास मुंगसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image