
अहिल्यानगर : रक्ताभिसरण प्रणालींशी संबंधित आजार सध्या आरोग्यविषयक गंभीर प्रश्न ठरत आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या या आजारांमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, उच्च रक्तदाब यांसारख्या शारीरिक समस्या निर्माण होतात. या आजारांची लक्षणे अनेकदा लपून राहतात आणि वेळेत निदान न झाल्यास त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. राज्यात सर्वाधिक मृत्यू या आजारांमुळे होतात.