प्रवरा नदीत रिटायर्ड पोलिस गेला वाहून

सुनील गर्जे
Tuesday, 22 September 2020

मधुकर दादा बर्डे (वय 61) असे वाहून गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसाचे नाव आहे. बर्डे दुपारी तीनच्या सुमारास पाचेगाव येथून पायी आपल्या गावी इमामपूरला (ता. नेवासे) जात होते. इमामपूरमधील युवकांच्या मदतीने संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध घेतला.

नेवासे : तालुक्‍यातील इमामपूरचे रहिवासी सेवानिवृत्त पोलिस नदी ओलांडून पायी घरी जात असताना आज दुपारी प्रवरा नदीत वाहून गेले. प्रवरेत व्यक्ती वाहून जाण्याची पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

मधुकर दादा बर्डे (वय 61) असे वाहून गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसाचे नाव आहे. बर्डे दुपारी तीनच्या सुमारास पाचेगाव येथून पायी आपल्या गावी इमामपूरला (ता. नेवासे) जात होते. इमामपूरमधील युवकांच्या मदतीने संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध घेतला.

अंधार पडल्याने तो थांबविण्यात आला. प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी घटनास्थळी आला नाही. नेवासे पोलिसांतही रात्री उशिरापर्यंत कुठलीच नोंद नव्हती. 
सध्या मुळा धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे.

दरम्यान, 9 सप्टेंबर रोजी पाचेगाव येथील बाळासाहेब माळी पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवरेत वाहून गेले होते. दुसऱ्या दिवशी, तब्बल सोळा किलोमीटर अंतरावर नेवासे येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह सापडला. अहमदनगर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Carried retired police went to Pravara river