esakal | गावे, वस्त्या-पाड्यांची जातीवाचक नावे बदलणार
sakal

बोलून बातमी शोधा

The caste names of villages and hamlets will be changed

दलित वस्त्यांना असलेली जातीवाचक नावे बदलली जाणार आहेत.

गावे, वस्त्या-पाड्यांची जातीवाचक नावे बदलणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर : राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब समोर आली. राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धीगंत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नांवे देण्याबाबत शासन निर्णयाद्वारे सूचना केलेल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर जिल्हयातही अशी नावे बदलावीत असे आवाहन राधाकिसन देवढे सहायक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर यांनी केले आहे. सदर विषयाचे महत्व लक्षात घेऊन, जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याची कार्यपद्धती शहरी भागासाठी नगर विकास विभागाने व ग्रामीण भागासाठी ग्राम विकास विभागाने निश्चित करुन जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही करणेबाबत शासनाने यापुर्वीच सूचना दिलेल्या आहेत.

 "अनुसूचित जाती व नव बौद्ध" शब्दाचा वापर :

शासनाच्या विविध विभागांच्या योजना, शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना यामध्ये "दलित" या शब्दाचा वापर केलेला असल्यास त्याऐवजी पर्यायी शब्द वापरण्याबाबत मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे याचिका क्र.114/2016 दाखल करण्यात आली आहे.

या दरम्यान "दलित"  शब्दाऐवजी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 नुसार निर्गमित केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशाअंतर्गत नमूद अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादीमध्ये इंग्रजी भाषेत Scheduled Caste  आणि अन्य राष्ट्रीय भाषांमध्ये Scheduled Caste या नामाभिधानाच्या योग्य अनुवादित शब्दाचा वापर करावा, अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत.

loading image