बिबट्याला पकडा अन्यथा आंदोलन करणार - शेतकरी आक्रमक | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

बिबट्याला पकडा अन्यथा आंदोलन करणार - शेतकरी आक्रमक

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खोकर-भोकर शिवारात मागील अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांना रोज बिबट्याचे दर्शन घडत आहे. त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण पसरले असून अनेकदा मागणी करून देखील वनविभागाकडून पिंजरा लावला जात नसल्याने शेतकरी वर्गातुन संताप व्यक्त होत आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

बिबट्याच्या वाढत्या हल्यांमुळे परीसरात भीतीचे वातावरण

गेल्या आठवड्यात भोकर शिवारात मुंढे यांच्या घरासमोरील विहीरी जवळील दगडात दबा धरून बसलेला बिबट्या कारभारी मुंढे (वय ७०) यांच्यावर धावला होता. परंतू दैवबलवत्तर म्हणून तेवढ्यात त्यांचा मुलगा दादासाहेब हे आल्याने व दोघांनी ओरडा केल्याने बिबट्याने तेथून धुम ठोकली. बिबट्याच्या वाढत्या हल्यामुळे परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्या, मादी व बछड्यांना तातडीने पकडण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र अंदोलन छेडणार असल्याचे सुदाम पटारे, दादासाहेब मुढे, संतोष मते व ​भाऊसाहेब खंडागळे यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

हेही वाचा: अहमदनगर : डॉक्‍टर-परिचारिकांचा ‘आगीशी खेळ’

हेही वाचा: शिवसेनेचा मराठी बाणा गेला कुठे?

loading image
go to top