डिग्रस येथे वाळूसह डंपर पकडला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

पोलिसांना पाहताच डंपर चालक व वाळू उपसा करणारे मजूर पळून गेले. सहा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

राहुरी,  : तालुक्‍यातील डिग्रस येथे (शुक्रवारी) मध्यरात्री मुळा नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणारा डंपर चार ब्रास वाळूसह पोलिसांनी जप्त केला. 

पोलिसांना पाहताच डंपर चालक व वाळू उपसा करणारे मजूर पळून गेले. सहा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

डंपर मालक अजित शिवाजी जगताप (रा. एमआयडीसी, नगर) व अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघेही पसार आहेत. काल मध्यरात्री एक वाजता राहुरी पोलिसांनी डिग्रस येथे मुळा नदीपात्रात छापा टाकला. यावेळी डंपर (एम. एच. 17 ए. जी. 9303) मध्ये चोरून वाळू भरली जात होती.

पोलिसांना पाहताच वाळू चोर पसार झाले. सहा लाखांचा डंपर व त्यातील सोळा हजार रुपयांची चार ब्रास वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिस कर्मचारी आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अहमदनगर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caught a dumper with sand at Digras

टॅग्स
टॉपिकस