जिल्हा परिषदेला उशिरा जाग 

Caution in Zilla Parishad due to complaints of employees
Caution in Zilla Parishad due to complaints of employees

नगर ः  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात व प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन तीन महिने लोटल्यानंतर आजपासून (ता. आठ) जिल्हा परिषदेत येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या माहितीची नोंद घेण्यास सुरवात झाली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यातच शासकीय कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती करण्याचा अध्यादेश सरकारतर्फे काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत 100 टक्के कर्मचारी येऊ लागले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा अभ्यागतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कर्मचारी धास्तावले होते. या गर्दीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत होती.

काहींनी काही विभागांत झालेल्या गर्दीची छायाचित्रे काढून ती संघटनेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविली आहेत. कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी, मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची माहिती नोंदवून घेऊनच संबंधिताला जिल्हा परिषदेत प्रवेश द्यावा, असा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार आजपासून नोंदणीला सुरवात झाली आहे. 
 

आवारातील कार्यालय "राम भरोसे' 
जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत येणाऱ्यांची तपासणी करून त्यांना आत प्रवेश दिला जात आहे. मात्र, आवारात असलेल्या जुन्या इमारतीतील कार्यालयांमध्ये व पंचायत समितीच्या इमारतीत असलेल्या माध्यमिक शिक्षण विभाग व वेतन पथक आदी कार्यालयांमध्ये कोण येते व कोण जाते, याची मात्र कोठेच नोंद होत नसल्याने, या ठिकाणच्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कर्मचाऱ्यांना होतेय अरेरावी 
जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येकाची पडताळणी संबंधित विभागात करून मगच त्या व्यक्तीला प्रवेश दिला जात आहे. मात्र, काही जण विनाकारण आल्याचे आढळल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून त्यांना मज्जाव केला जात असल्यामुळे काही जणांकडून कर्मचाऱ्यांना अरेरावी करण्यात आल्याच्या घटना घडत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com