Shrirampur : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या यशाबद्दल फटाके फोडून विजयोत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीरामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या यशाबद्दल फटाके फोडून विजयोत्सव साजरा

श्रीरामपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या यशाबद्दल फटाके फोडून विजयोत्सव साजरा

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) - केंद्र सरकारने केलेले सुधारीत कृषी कायदे रद्द करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) सकाळी केली. दिल्लीसह देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या लढ्यातील पहिल्या टप्प्यातील विजय मानला जातो. या पार्श्वभूमीवर येथील मेनरोड समोरील महात्मा गांधी चौकात भाजपा वगळता शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी-कामगारच्या वतीने शेतकरी आंदोलनात शहिद झालेल्यांना श्रद्धांजली वाहुन अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने दिल्लीतील शेतकरी आंदोलनास यश आल्याबद्दल फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार लहु कानडे, श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके, श्रीकृष्ण बडाख, कामगार नेते नागेश सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, कैलास बोर्डे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, अॅड समीन बागवान, संविधान बचाव समितीचे अहमदभाई जहागीरदार, लाल निशाण पक्षाचे जीवन सुरूडे, फैयाज इनामदार, प्रहार संघटनेचे विवेक माटा, सागर दुपाटी, शिवसेनेचे सचिन बदडे, यासिन सय्यद, चरण त्रिभुवन, संतोष मोकळ, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

हेही वाचा: ठेकेदार, अधिकाऱ्यांनी काय ‘दिवे’ लावले?

याप्रसंगी आमदार कानडे, लकी सेठी, राजेंद्र बावके, नागेशभाई सावंत, अमरप्रित सेठी, संतोष मोकळ, जीवन सुरूडे, अहमदभाई जहागीरदार, विवेक माटा यांची भाषण झाली. संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी आंदोलनाच्या तीन मुख्य मागण्यांपैकी केंद्राने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा आज झाली. परंतु त्यासोबत किमान आधारभूत किमतीचा केंद्रीय कायदा व्हावा व प्रस्तावित वीज विधेयक रद्द करण्यासाठी किसान आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अद्यापही कायम आहे. आजची घोषणा हा पहिल्या टप्प्यातील विजय असून कृषी कायदे जोवर संसदेत प्रत्यक्षपणे रद्द होत नाहीत. तसेच जोवर सरकार कृषी आंदोलनाच्या इतर महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करीत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा व्यक्त केला.

यावेळी शंकर फरगडे, सुनिल इंगळे, अजय बत्तीसे, सुयोग ससकर, सरबजीत सिंग सेठी, राहुल दाभाडे, विजय शेळके, सुभान पटेल, संतोष केदारी, दीपक शेळके, लखन डांगे, दीपक कदम, तोफिक शेख उपस्थित होते.

loading image
go to top