विविध सामाजिक उपक्रम राबवून मंत्री गडाखांचा वाढदिवस साजरा

विविध सामाजिक उपक्रम राबवून मंत्री गडाखांचा वाढदिवस साजरा
Summary

सोनई येथील यश ग्रुपच्या वतीने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून यापुढेही एक महिना गरजूंना घरपोच ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोनई (अहमदनगर) : सोनई व परिसरातील सेवाभावी संस्था व मित्रमंडळाच्या वतीने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला आहे. या विधायक कार्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. (celebrated the birthday of water conservation minister shankarrao gadakh by implementing various social activities)

विविध सामाजिक उपक्रम राबवून मंत्री गडाखांचा वाढदिवस साजरा
40 वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर भाजप सत्तास्थानी; अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची खडतर वाटचाल

शनिशिंगणापुर येथील शनैश्वर माध्यमिक विद्यालय व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आप्पासाहेब शेटे व प्रा. दिलीप लोडे यांनी शनैश्वर कोविड सेंटर मधील रुग्णांना मिष्टान्न भोजन दिले. मंत्री गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी ग्रामीण रुग्णालयात पन्नास सिलिंडर क्षमतेचा प्रकल्प लवकरच कार्यान्वीत करणाचा निर्णय घेतला.

शंकरराव गडाख युवा मंचच्या वतीने उस्थळदुमला व सलबतपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला व वृद्ध रुग्णांना बसण्यासाठी साठ खुर्च्या देण्यात आल्या.

पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अभिराज सुर्यवंशी, युवा कार्यकर्ते राजेंद्र भदगले, शेखर जाधव, भाऊसाहेब आठरे आदी उपस्थित होते.

विविध सामाजिक उपक्रम राबवून मंत्री गडाखांचा वाढदिवस साजरा
कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि"र्बंद", कापडबाजारात शुकशुकाट

सोनई येथील यश ग्रुपच्या वतीने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून यापुढेही एक महिना गरजूंना घरपोच ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोनई वाहन मेळाव्याच्या वतीने संचालक मल्हारी वाघ मित्रमंडळाने वृक्षारोपण केले. नेवासे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आकाश धनवटे यांनी स्वच्छतेच्या कामासाठी ग्रामीण रुग्णालय, नेवासे फाटा करीता पाण्याचा टॅंकर दिला आहे. पानेगाव येथे वृक्षारोपण तर घोडेगाव, चांदे परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले. (celebrated the birthday of water conservation minister shankarrao gadakh by implementing various social activities)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com