हज यात्रेच्या नियमात यावर्षी बदल

गौरव साळुंके
Sunday, 8 November 2020

आगामी हज यात्रेसाठी भारत सरकार व सौदी सरकारने यात्रेसाठी नियमात काही बदल केलेले आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : आगामी हज यात्रेसाठी भारत सरकार व सौदी सरकारने यात्रेसाठी नियमात काही बदल केलेले आहेत. यात्रेला जाण्यासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असुन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यात्रेचे अर्ज स्विकारले जातील. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी हज यात्रेसाठी काही निर्बंध घातले आहेत. यात्रेचा कालावधी कमी करुन 30 दिवस केला आहे. यात्रेकरुंचे वय 18 ते 65 असून वयोवृद्धांना यात्रेसाठी परवानगी नाही. एका खोलीत फक्त तीन भाविक राहण्यास परवानगी आहे. यात्रेसाठी लागणाऱ्या शुल्काचा पहिला हफ्ता दीड लाख आहे. विलगिकण संदर्भातील शुल्क यात्रेकरुंना द्यावे लागेल. तसेच भारतीय यात्रेकरुंच्या संख्येतही कपात केली असुन प्रत्येक राज्यातुन पाचशे भाविकांना यात्रेसाठी जाण्यास परवानगी आहे. 

जम्मू-काश्‍मीरमधील दोन हजार भाविकांना यात्रेसाठी परवानगी दिली आहे. हज यात्रेसाठी हवाई उड्डाण केंद्रांमध्येही कपात केली असून पूर्वी 21 ठिकाणाहून हज यात्रेची उड्डाने होत होती. आता केवळ दहा ठिकाणे ठेवली आहेत. दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता, लखनऊ, मुंबई, श्रीनगर, अहमदाबाद, बेंगलोर, कोचीन हवाई अड्यांचा समावेश आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in the rules of Hajj pilgrimage from the Government of India this year