

Fear Grips Chedgaon Village After Series of Leopard Attacks
Sakal
राहुरी : चेडगाव येथे मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील पंधरवड्यात सलग तीन दिवस बिबट्याने चार जणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता भर रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.