Ahmednagar : एकलहरे शिवारात दरोडा,गळा आवळून खून,रोख सात लाखांसह दागिने लांबविले

सकाळी जिल्हा गुन्हे अन्वेषणची तुकडी, ठसेतज्ज्ञ, श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.
ahmednagar
ahmednagarsakal

श्रीरामपूर, बेलापूर - उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बंगल्यावर मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दरोडा पडला. दरोडेखोरांनी नईम रशीद पठाण (वय ४०) यांचा गळा आवळून खून केला, तर त्यांच्या पत्नी बुशराबी गंभीर जखमी आहेत. घरातून रोख सात लाख रुपये व सोन्याचे दागिने लांबविण्यात आले आहेत.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

एकलहरे- बेलापूर रस्त्यालगत नईम पठाण यांची शेतवस्ती आहे. नईम हे पत्नी बुशराबी व दोन मुलांसह घरी होते. रात्री एक ते दोनच्या सुमारास त्यांच्या पत्नी लघुशंकेला घराबाहेरील स्वच्छतागृहात गेल्या तेव्हा बाहेर दबा धरून बसलेले चार पुरुष व एका महिलेने नईमच्या त्यांना फरफटत घरात आणले. जबर मारहाण करायला सुरवात केली. आरडाओरडा होताच नईम यांना दरोडेखोर घरात आल्याचे दिसले. काही वेळ त्यांची

झटापट झाली. मात्र, लगेचच दरोडेखोरांनी नईम यांना घरातील झोक्याच्या ओढणीने गळफास देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर घरातील सात लाखांची रोकड व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.

ahmednagar
chatrpati sambhaji nagar : कौटुंबिक वादातून सावळीविहीरमध्ये तिहेरी हत्याकांड

बुशराबी यांनी घटनेची माहिती एकलहरे येथे वास्तव्यास असलेले अन्वर शेख यांना दिली. ते अनिस शेख यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. अनिस शेख यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे कार्यक्षेत्रात संदेश दिला. अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

ahmednagar
Chatrpati Sambhaji Nagar : छोट्या गणेशमूर्तींचे घरात करा विसर्जन

सकाळी जिल्हा गुन्हे अन्वेषणची तुकडी, ठसेतज्ज्ञ, श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनीही घटनास्थळी भेट दिली. पाऊस पडलेला असल्याने श्वान घरातच घुटमळले. घटनेच्या कालावधीत एक चारचाकी कार या रस्त्याने वारंवार गेल्याचे दिसून आले.

नईम यांचा बेलापूर येथे बॅटरीचा व्यवसाय होता. जागेच्या व्यवहारासाठी त्यांनी मोठी रक्कम घरात आणली होती. याची सखोल माहिती दरोडेखोरांना असल्याने नियोजनपूर्वक दरोडा टाकल्याची चर्चा आहे. दरोडेखोर हे स्थानिक असल्याचा संशय असून, नईम यांनी त्यांना ओळखल्यानेच हत्या केल्याचे घटनास्थळी बोलले जात होते.नईम यांच्या मागे पत्नी, आई, वडील, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.

आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, करण ससाणे, शरद नवले, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, सुधीर नवले आदींनी घटनास्थळी भेट देऊन, तपास वेगाने करून दरोडेखोरांना गजाआड करण्याची मागणी केली. याप्रकरणी अन्वर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फुटेजवरून तपास सुरू बेलापूर

ahmednagar
Solapur News : तीन वेळा अपयश,नकारात्मक न होता,विद्याची जिद्दीने यशाला गवसणी

उक्कलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. यातील नऊ फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. या घटनेचा सर्वच अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

मृताचे नातेवाईक संतप्त

मृत नईम यांच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत अंत्यविधीस नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी हस्तक्षेप केला, तसेच अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी आश्वासन दिले. त्यानंतर अंत्यविधी पोलिसांच्या बंदोबस्तात दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com