मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला कामाचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी नगरच्या शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली. या वेळी जिल्ह्यातील पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्‍त केले.

अहमदनगर : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी नगरच्या शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली. या वेळी जिल्ह्यातील पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्‍त केले. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बलवंत सिंह, तसेच राज्य निवडणूक विभागाचे अवर सचिव अ. ना. वळवी यांचे स्वागत केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तसेच निवडणूक शाखेचे तहसीलदार, नायब तहसीलदार या वेळी उपस्थित होते. 
अधिकाधिक नवमतदार नोंदणी, मतदान केंद्रांचे बळकटीकरण, तसेच दुबार मतदार वगळण्याबाबत या विशेष मोहिमेत भर देण्याच्या सूचना बलदेव सिंह यांनी केल्या. जिल्हास्तरावर विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. 

संपूर्ण नगर जिल्ह्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 15 डिसेंबरपर्यंत हरकती आणि दावे स्वीकारावेत. सर्व विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक शाखांनी सर्व दावे व हरकतींचे निराकरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश या वेळी सिंह यांनी दिले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Chief Electoral Officer reviewed the work