Parner News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेतली भेट

अण्णा तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, तुम्हाला हसताना पहावयाचे आहे. अण्णा तुम्हाला शतक पूर्ण करावयाचे आहे, हे लक्षात ठेवा.
anna hazare, cm devendra fadnavis and girish mahajan

anna hazare, cm devendra fadnavis and girish mahajan

sakal

Updated on

पारनेर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी हजारे यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी फडणवीस म्हणाले, अण्णा तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, तुम्हाला हसताना पहावयाचे आहे. तसेच तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी इथे आलो आहे. आता सर्व तपासण्या केल्याशिवाय इथून गावी जायचे नाही. अण्णा तुम्हाला शतक पूर्ण करावयाचे आहे, हे लक्षात ठेवा. अशाप्रकारची चर्चा हजारे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी देवराम पळसकर तसेच हजारे यांच्यासोबत असलेले उद्योजक सुरेश पठारे माजी सरपंच लाभेश औटी, दत्ता आवारी हे उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com